परभणी - जिल्ह्यातील पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या जलाशयातून पूर्णा नदीच्या पात्रात आज (शुक्रवारी) पहाटे पाणी सोडण्यात आले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्रीच नदी पात्राच्या काठावरील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचा इशारा परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी व पूर्णा पांटबंधारे विभागाने दिला होता. दरम्यान, येलदरी जलाशयात गुरुवारी सकाळीच 91.35 टक्के पाणीसाठा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
परभणीच्या येलदरी, सिद्धेश्वर धरणातून मध्यरात्री पाण्याचा विसर्ग; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग
गेल्या काही दिवसांपासूून बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने खडकपूर्णा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे त्या धरणातून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक येलदरी धरणात सुरू झाल्याने येलदरी धरणदेखील गुरुवारी सकाळी तब्बल 91 टक्के भरले. शिवाय दिवसभर ही पाण्याची आवक सुरू होती.
![परभणीच्या येलदरी, सिद्धेश्वर धरणातून मध्यरात्री पाण्याचा विसर्ग; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Water released from yeldari dam](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-06:55:06:1596763506-pbn-yeldari-dam-over-fllow-7203748-07082020000749-0708f-1596739069-477.jpg)
गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे त्या धरणातून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक येलदरी धरणात सुरू झाल्याने येलदरी धरण देखील गुरुवारी सकाळी तब्बल 91 टक्के भरले. शिवाय दिवसभर ही पाण्याची आवक सुरू होती. ज्यामुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत येलदरी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात करण्याची तयारी पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आली होती. मध्यरात्रीनंतर कुठल्याही क्षणी हे पाणी सोडण्यात येणार होते. त्यामुळे येलदरीपासून पुढे पूर्णा तालुक्यापर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, आपली जनावरे, तात्पुरत्या झोपड्या, गोठे सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते.
दरम्यान, गुरुवारी (ता.सहा) सकाळी सहा वाजता येलदारी जलाशयात 864.407 मिलीमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातील 739.730 दशलक्ष घनमीटर एवढा जीवंत पाणीसाठा आहे. शिवाय आणखी पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे या जलाशयात पाण्याची आवक अशीच सुरूच राहिल्यास काही दरवाजे उघडून हे पाणी पूर्णा नदीत सोडण्यात येत आहे.