महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत ३० केंद्रांमधील व्हीव्हीपॅटची मोजणी होणार

परभणी लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ याप्रमाणे ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार, असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

परभणीत ३० केंद्रांमधील व्हीव्हीपॅटची मोजणी होणार

By

Published : Apr 30, 2019, 9:17 PM IST

परभणी- परभणी लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ याप्रमाणे ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार, असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. यावेळी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर झाला आहे. या व्हीव्हीपॅट यंत्रांच्या चिठ्ठ्यांची मोजणी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष होणार असल्याने याविषयी उत्सुकता लागली आहे.

परभणीत ३० केंद्रांमधील व्हीव्हीपॅटची मोजणी होणार

परभणी लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात आली होती. मतदानंतर या मशीन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँगरुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी स्ट्राँगरुमला पहारा देण्यात येत आहे. दरम्यान, प्रत्येक मतदाराला मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर कोणाला मतदान केले, याची चिठ्ठी ७ सेकंदापर्यंत पाहता आली. त्यानंतर ही चिठ्ठी मशीनला जोडलेल्या ट्रेमध्ये जमा झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्रणा कार्यान्वित होती.

व्हीव्हीपॅट मोजणीसंदर्भात निवडणूक आयोगाने नुकतेच एक पत्र काढले आहे. त्यानुसार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे मतदान केंद्र रँडम पद्धतीने निवड करण्यात येणार आहेत. ईव्हीएम मशीनचे मतदान मोजणी झाल्यानंतर निवडलेल्या ५ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार अूसन, त्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनच्या मतदानाशी पडताळणी केली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details