परभणी - एकविसाव्या शतकातला मतदार राजा आता सुज्ञ झाला आहे. उमेदवारांकडून मिळणाऱ्या भूलथापांना तो आता बळी पडत नाही. याचा प्रत्यय परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आला आहे.
परभणीच्या गंगाखेड येथील आमदाराची मतदारांनी केली बोलती बंद; व्हिडिओ व्हायरल - राष्ट्रवादी काँग्रेस बातमी
परभणीत एक उमेदवाराने समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका केली असता, त्या मतदारांनी तुमच्या बंद्दल बोला असे सुनावले. या प्रसंगाचा व्हिडीओ जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल होत आहे.
या ठिकाणच्या विद्यमान आमदाराने प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करण्याचा प्रयत्न केला; मात्र, मतदारांनी साफ सांगितले, 'तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, समोरच्याबद्दल आम्हाला ऐकायचे नाही, तुम्ही काय केले ते बोला' असे म्हणत मतदारांनी या आमदाराची बोलतीच बंद केली. सध्या हा व्हिडिओ जिल्ह्यात जोरदार व्हायरल होत असून याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, हे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे असून ते प्रचारानिमित्त मतदारसंघातील माखणी या गावात गेले असता, तेथे हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.