परभणी- जिल्ह्यात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे पालम आणि मानवत तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. परिणामी या नद्यांच्या खोऱ्यातील सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील दुधना, गलाटी आणि लेंडी नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आला असून या नद्यांचे पाणी पात्राबाहेर २ किलोमीटर पर्यंतच्या शेतशिवारांमध्ये पसरले आहे. यामुळे खरिपाचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
परभणीत रात्रभर धुवाधार; नद्यांच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, निम्न दुधनातून पाण्याचा विसर्ग
मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या नद्यांना पूर आला होता. त्यामुळे आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला होता. अशीच परिस्थिती आज उद्भवली आहे. बुधवारी दुपारपासून परभणी जिल्ह्यात पावसाची बॅटिग सुरू आहे. मध्यरात्री त्यात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे पालम तालुक्यातील या दोन्ही प्रमुख नद्यांचे पाणी नदी पात्र सोडून दोन हेक्टर क्षेत्रावर वाहत आहेत.
आठवड्यात दुसर्यांदा गावांचा संपर्क तुटला -
पालम तालुक्यातून गोदावरीसह गलाटी आणि लेंडी या दोन प्रमुख नद्या वाहतात. त्यापैकी गोदावरी नदीचे पात्र मोठे असल्याने या नदीला अजूनपर्यंत पूर आलेला नाही. मात्र, गलाटी आणि लेंडी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या नद्यांना पूर आला होता. त्यामुळे आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला होता. अशीच परिस्थिती आज उद्भवली आहे. बुधवारी दुपारपासून परभणी जिल्ह्यात पावसाची बॅटिग सुरू आहे. मध्यरात्री त्यात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे पालम तालुक्यातील या दोन्ही प्रमुख नद्यांचे पाणी नदी पात्र सोडून दोन हेक्टर क्षेत्रावर वाहत आहेत. त्यात हजारो हेक्टर खालील पिके पाण्याखाली गेली आहेत.
मानवत तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू असून सभोवतालचे नदी नाले ओढे देखील ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे दुधना नदीला पूर येऊन मानवत तालुक्यातील मगर सावंगी या गावचा संपर्क तुटला आहे. तसेच पाथरी-परभणी महामार्गावरील किन्होळा पाटीजवळ असलेला वळण रस्ता पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतूक सकाळी अकरा वाजेपर्यंत ठप्प झाली होती.