परभणी -विकासाची दृष्टी केवळ भाजपकडेच असून बाकीच्यांना विकासाच काही देणं-घेणं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी विकास करूच शकत नाहीत. कारण जेव्हा देशात संकट उभे होते, तेव्हा राहुल गांधी परदेशात पळून गेले, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. जिंतूर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या सेलू येथे भाजपच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या सभेपासून त्यांनी महाराष्ट्रातील प्रचार सुरू केला आहे. नगराध्यक्ष विनोद बोराडे, संजय साडेगावकर, सुरेश भुमरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आदित्यनाथ म्हणाले, सौभाग्य, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री घरकुल आदी योजनांमुळे समाजातील प्रत्येक घटक हा विकासात सहभागी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पूर्वी देशाचा विकास हा जाती-धर्मापुरताच मर्यादित असल्याचे सांगून आता समाजातील सर्व घटक यात सहभागी झाला असल्याचे ते म्हणाले. तसेच, देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र हे सूत्र कायम राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय मोदींनी देशातील 10 करोड जनतेला शौचालय दिले. आता देशातील प्रत्येक जनतेला स्वछ पाणी देण्याचा मोदींचा संकल्प असून तो लवकरच पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -'राफेल' पुढे ठेवलेल्या लिंबू वरून ओवैसींनी परभणीत उडवली भाजप-सेनेची टर