हिंगोली -औंढा नागनाथ तालुक्यातील जांभरून आंध येथे मुक्कामी आलेल्या बसेसच्या काचा अज्ञात व्यक्तीने फोडून दहा हजार रुपयांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी चालक गजानन पोटे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोलीत अज्ञातांनी फोडल्या बसच्या काचा; औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - hingoli police
औंढा नागनाथ तालुक्यातील जांभरून आंध येथे मुक्कामी आलेल्या बसेसच्या काचा अज्ञात व्यक्तीने फोडून दहा हजार रुपयांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी चालक गजानन पोटे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चालक औंढा नागनाथ तालुक्यातील जांभरून येथे (एमएच 06 एस 8597) ही बस घेऊन गेले होते. त्यांनी बस नेहमीच्या ठिकाणी लावली आणि बसच्या जवळच आराम करण्यासाठी बसले. दरम्यान, काही जण आले आणि बसवर दगडफेक केली व फरार झाले. यामध्ये बसच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकाराने चालक घाबरून गेला होता. बसचे जवळपास दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने ही बस एका जागेवर उभी होती यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे बीट जमादार रवी इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनेचा पंचनामा केला असून, गुन्हा दाखल झाला आहे. औंढा नागनाथ पोलीस आता दगडफेक करणाऱ्याचा शोध घेत आहेत. अयोध्या निकाल प्रकरणात निकाल लागणार असल्याने, पोलीस यंत्रणा सतर्क आहे. लवकरच दगड फेक करणाऱ्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - सेनाभवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून जिल्हाध्यक्षांना शेतकरी मदतीचे आदेश