महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळजनक.. परभणीत सावकारांच्या जाचाला कंटाळून दोन तरुणांची आत्महत्या - दोन तरुणांची आत्महत्या

खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. रोजगार गेलेल्या लोकांना अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसै देण्यात येतात. या प्रकरणात आरोपींनी मिस्त्री काम करत असलेल्या रितेशला पाचशे रुपये शंभर रुपये रोजाने व्याजावर दिले होते. दुसऱ्या तरुणाला आठवड्याला सातशे रुपये व्याजाने पाच हजार रुपये दिले.

two-youth-committed-suicide
two-youth-committed-suicide

By

Published : Sep 1, 2021, 9:12 PM IST

Updated : Sep 1, 2021, 9:57 PM IST

परभणी -खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून दोन तरुणांनी विष पिऊन सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोनपेठ शहरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार सावकारांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, मृत तरुणांनी एकमेकांच्या हात-पाय आणि पोटावर लिहिलेल्या मजकूरात सावकारांची नावे लिहिलेले आढळून आले आहे. सुनिल पारवे (21) आणि रितेश क्षीरसागर (35) असे या मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.


बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते तरुण -

सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरातील बुवापीर रस्त्यावर सोमवारी दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे काही नागरिकांना आढळून आले होते. या युवकांना त्यांच्या नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीने सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. युवकांची परीस्थिती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान 30 ऑगस्ट रोजी रात्री सुनील पारवे या युवकाचा मृत्यू झाला, तर थोड्या वेळातच दुसरा गंभीर असलेला रितेश क्षीरसागर याचाही मृत्यू झाला.

माहिती देताना पोलीस अधिकारी
चार सावकारांवर गुन्हे दाखल -
या युवकांच्या हाता-पायावर व पोटावर अजय मुंडे, सुनील मुंडे, हनुमंत घुगे व ऋषी कौडगाव यांनी दारु पाजून पैसै दिले, असे लिहून सही केल्याचे आढळुन आले होते. त्याप्रमाणे सदरील मृत तरुणांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिसांनी अजय घुगे, सुनिल मुंडे, हनुमंत घुगे व ऋषी यांच्या विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे, धमकी देणे व सावकारी अधिनियमानूसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी दिली.




हे ही वाचा -मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज घेणार राज्यपालांची भेट, 12 आमदारांचा प्रश्न सुटणार?


फरार आरोपींचा शोध सुरू -

सदरील गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मंचक फड हे करत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध मार्गांवर पथके पाठविले असल्याचे सांगितले.

हे ही वाचा -Manike Mage Hithe: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी गायिका आहे तरी कोण?, नेटीझन्सना भुरळ, बिग बीही फॅन

पाचशे रुपये ला शंभर रुपये रोज व्याज -

सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. रोजगार गेलेल्या लोकांना अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसै देण्यात येतात. या प्रकरणात आरोपींनी मिस्त्री काम करत असलेल्या रितेशला पाचशे रुपये शंभर रुपये रोजाने व्याजावर दिले होते. मात्र, हाताला काम नसल्याने रितेश शंभर रुपये रोज व्याज देऊ शकला नाही. त्यामुळे सावकार त्याचा रोज छळ करत असत तर दुसरा मृत सुनील पारवे याला पाच हजार रूपये आठवड्याला सातशे रुपये व्याजाने दिले होते. या व्याजाच्या वसुलीसाठी चौघे सावकार त्यांचा छळ करत होते, असे नातेवाईकांनी फिर्यादीत म्हटल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी दिली आहे.

कठोर कारवाई करण्याची मागणी -

दरम्यान, अवैध सावकारांच्या छळामुळे या 2 तरुणांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यामुळे अशा अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Last Updated : Sep 1, 2021, 9:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details