परभणी -येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या मुख्य रस्त्यावर एका दुचाकीने रस्त्यात पेट घेतला. पाहता-पाहता ही गाडी आगीत भस्मसात झाली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून दुचाकी मालक सुखरूप आहे.
परभणीत भररस्त्यात दुचाकीने पेट घेतला; गाडी भस्मसात - Due to short circuit, two wheelerscaught fire
परभणी येथील छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याजवळच्या मुख्य रस्त्यावर एका दुचाकीने रस्त्यात पेट घेतला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
![परभणीत भररस्त्यात दुचाकीने पेट घेतला; गाडी भस्मसात two-wheels-caught-fire-in-parbhani](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5205352-1059-5205352-1574941060943.jpg)
ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. दुचाकी चालक वसमत रोडकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळून स्टेशन रोडकडे जात होता. त्यावेळी अचानक गाडी मधून धुर निघत असल्याने दुचाकीस्वाराने गाडी जागेवरच थांबवली त्यानंतर गाडीत स्पार्किंग होऊन गाडीने पेट घेतला. काही वेळातच ही आग भडकली आणि यामध्ये सदर दुचाकी जळून भस्मसात झाली. ही गाडी स्कुटी असल्याचे समजते. याबाबत दुचाकीस्वाराला माहिती विचारल्यास त्याने नकार दिला. माझी दुचाकी जळून खाक झाली मला कोणालाही काही माहिती द्यायची नाही, असे म्हणत तो तिथून निघून गेला दरम्यान यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळी येऊन नोंद घेतली असून याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.