परभणी - शहरातील पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे आज (बुधवारी) पहाटे कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले. या पाठोपाठ सकाळी 11 वाजताच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे देखील उपचारादरम्यान निधन झाले आहे. एकाच दिवशी दोन कोरोनायोद्धा पोलिसांचे निधन झाल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते.
परभणीत एकापाठोपाठ 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू - police death in corona
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील ग्रामीण पोलीस ठाण्यात 49 वर्षीय पोलीस कर्मचारी कार्यरत होते. तर दुसरे 54 वर्षीय पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत होते. कोरोनामुळे त्रास जाणवत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. एकाचा पहाटे तर दुसऱ्याचा सकाळी 11 वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला.
पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी
5 तासांच्या अंतराने दोघांचा मृत्यू
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील ग्रामीण पोलीस ठाण्यात 49 वर्षीय पोलीस कर्मचारी कार्यरत होते. तर दुसरे 54 वर्षीय पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत होते. कोरोनामुळे त्रास जाणवत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. एकाचा पहाटे तर दुसऱ्याचा सकाळी 11 वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.