परभणी - जिंतूर तालुक्यातील शेवडीसह परिसरातील 15 हून अधिक शेतकर्यांना दोन भामट्यांनी तब्बल 31 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 16 डिसें.) शेवडी येथील शेतकरी बालाजी आश्रोबा घुगे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अमोल अशोकअप्पा एकशिंगे व बाळू वैजनाथअप्पा एकशिंगे या दोघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवडी (ता.जिंतूर) व परिसरातील काही गावच्या शेतकर्यांची त्यांनी 25 जून रोजी हळद व सोयाबीन खरेदी केले होते.
'पैसे नंतर देतो, म्हणून उचलला माल'
संबंधित दोन भामट्यांनी गावातील शेतकर्यांचा विश्वास संपादन करत कच्च्या पावत्या करून शेतकऱ्यांचा माल नेला. त्यावेळी मालाचे पैसे थोड्या दिवसांनी देतो, असे म्हटले होते. त्यांच्या त्या बोलण्यावर सर्वांनी विश्वास ठेवला. जवळपास 30 लाख 87 हजार 644 रुपयांचे सोयाबीन व हळद या दोघांनी खरेदी केले. जून महिन्यात हा व्यवहार झाला होता. आडतीसाठी खरेदी असल्याने पैसे नंतर देतो, असे त्यांनी सर्वांना म्हटले. मात्र, अद्यापही शेतकर्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पैशासाठी शेतकऱ्यांनी संपर्क केला असता, दोघांचेही मोबाईल बंद येत आहे.
'भामट्यांनी आडत दुकानही केले बंद'