महाराष्ट्र

maharashtra

परभणीत 5 दिवसांनंतर आढळले दोन कोरोनाबाधित.. एकूण रुग्णांची संख्या 91 वर..

By

Published : Jun 9, 2020, 3:32 PM IST

परभणी जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नव्हता. मात्र, आज (दि. 9 जून) दोन नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तर सोमवारी (दि. 8 जून) 12 जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या 26 जणांवर रुग्णालयात कोरोनाबाबत उपचार सुरु आहेत.

COVID Hospital
कोरोना रुग्णालय

परभणी - मागील पाच दिवसांपासून एकही रूग्ण न आढळलेल्या परभणी जिल्ह्यात आज मंगळवारी (दि. 9 जून) मानवत येथील 44 वर्षीय पुरुष आणि सेलू येथील एका 45 वर्षीय कोरोनाबाधित महिलेची भर पडली आहे. सकाळी आलेल्या अहवालात त्या दोघांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 91 वर पोहचली आहे. त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला असून 63 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरित 26 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यातील गुरुवारी आढळून आलेल्या तीन कोरोना बाधित रुग्णांनंतर थेट आज मंगळवारी दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सेलू शहरातील अजिंठा नगरातील एका 45 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून दुसरा पुरुष रुग्ण मानवत शहरातील असल्याची माहिती अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.प्रकाश डाके यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी (दि. 8 जून) उशिरापर्यंत 4 संशयीत दाखल झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील संशयितांची संख्या 2 हजार 483 पर्यंत पोहचली आहे. त्यातील 68 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत. तर 2 हजार 390 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 91 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर 80 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 37 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. तसेच सोमवारी उशिरापर्यंत नव्याने दाखल झालेल्या 9 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगिकरण कक्षात 396 तर रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 93 जण आहेत. यापूर्वी विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करणाऱ्यांची संख्या 1 हजर 994 असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. तसेच सोमवारी पूर्णा येथील फुले नगरातील 3, माटेगावातील 6 तर गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील 3 असे एकूण 12 कोरोनामुक्त रुग्णांना कोरोना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

हेही वाचा -राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस तातडीने खरेदी करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details