परभणी- जिल्ह्यातील सेलूच्या गायत्री नगरात दोघा संशयित व्यक्तींकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतूस तसेच धारधार खंजीर जप्त केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका पथकाने सेलूतील तहसील रस्त्यावर गायत्री नगरच्या कॉर्नरजवळ दोघा संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. विचारपूस सुरू केली, तेव्हा या दोघांनी उडावउडवीची उत्तरे दिली. पथकाने या दोघांची झडती घेतली असता, करतारसिंग हत्यारसिंग टाक (वय 22 वर्षे, रा. इंदिरानगर, कळमनुरी) याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व तीन काडतूस तसेच आनंद दगडू ढोले (वय 29 वर्षे, रा.गायत्री नगर) याच्याकडे खंजीर मिळाला.
सेलूत गावठी पिस्तूल, काडतूस अन् खंजीर जप्त; दोघांना अटक - सेलू शहर बातमी
सेलू येथील गायत्री नगरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक पिस्तूल, तीन काडतूस आणि एक धारदार खंजीरसह दोघांना ताब्यात घेतले असून त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहे.
सेलू पोलीस ठाणे
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तसेच दोन मोबाईलही जप्त केले आहेत. या प्रकरणात सेलू पोलीस ठाण्यात काल (बुधवार) रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे.
हेही वाचा -'शेतकऱ्यांना मदत करण्याची आघाडी सरकारची नियत आहे का ?'