महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत 25 कोरोनाबधितांचा मृत्यू, 943 रुग्णांची भर - परभणीत २५ रूग्णांचा मृत्यू

परभणीत 25 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाय नवीन 943 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

परभणी
परभणी

By

Published : Apr 23, 2021, 10:36 PM IST

परभणी -जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असून, आज शुक्रवारी तब्बल 25 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 943 नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण उपचाराधीन बधितांचा आकडा 6 हजार 894 एवढा झाला आहे. 532 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. वाढत्या संसर्गामुळे 17 एप्रिल पासून जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन असून या दरम्यान बाधितांची संख्या कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यात दिवसेंदिवस भर पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग गंभीर रूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत 754 बधितांचा मृत्यू -

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून शुक्रवारी 943 नवीन बाधित आढळले तर 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 6 हजार 894 बाधित उपचार घेत आहेत. आजपर्यंत 754 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 29 हजार 973 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 22 हजार 325 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 26 हजार 694 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 95 हजार 870 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, 29 हजार 973 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 852 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले आहेत.

आयटीआय इमारतीत 18 रुग्णांचा मृत्यू -

गेल्या 24 तासात 25 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय इमारतीमधील कोरोना रूग्णालयामध्ये तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात 1 आणि इतर रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये झाला आहे.

परभणी जिल्ह्यात 276 बेड रिकामे -

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना रूग्णालयासह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना सुरू आहेत. ज्यामध्ये 6 हजार 894 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, या सर्व 30 रुग्णालयांमध्ये 6 हजार 901 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या केवळ 276 बेड रिकामे आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक बेड रेणुका रूग्णालय येथे 100 बेड रिकामे असून, त्याखालोखाल जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय रूग्णालयामध्ये 45 बेड शिल्लक आहेत. जिल्हा रुग्णालयात 2, जिल्हा परिषद कोरोना रूग्णालय 3, भारत रूग्णालय 6, डॉ. प्रफुल पाटील रूग्णालय 14, अक्षदा मंगल कार्यालय 28, सूर्या रूग्णालय 14, सिद्धिविनायक रूग्णालय 4, ह्यात रूग्णालय 3, सुरवसे मॅटर्निटी 7, क्षीरसागर रूग्णालय 2, पार्वती रूग्णालय 2, देहरक्षा रूग्णालय 22, स्पर्श रूग्णालय 17 तर गोकुळ रूग्णालयमध्ये 15 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच 5 हजार 336 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.

963 संशयितांची तपासणी -

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 963 संशयितांची 'आरटीपीसीआर' चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयात 239, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात 124, पालम ग्रामीण रुग्णालयात 60, पूर्णा 226, सोनपेठ 98, पाथरी 97, सेलू 85 तर जिंतूर रुग्णालयांतर्गत 34 संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details