परभणी- जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या पेठशिवणी परिसरात रविवारी (दि.26) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भरधाव जीप आणि कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला ( Three Died in Accident at Parbhani ) असून एक जण गंभीर जखमी आहे. कारमधील सर्वजण पुण्यातील रहिवासी असून गंभीर जखमीला उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.
अपघात होताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनातून जखमींना तत्काळ बाहेर काढून पालमच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. तर रुग्णवाहिकेला बोलावून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील बाजूचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. जीपची पुढची काच फुटून नुकसान झाल्याचे दिसून येते.