परभणी - तालुक्यातील भारस्वाडा येथू 'आयपीएल' क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तिघा बुकीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई काल (मंगळवार) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. त्यांच्याकडून 77 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
परभणीत 'आयपीएल'च्या 3 सट्टाबहाद्दरांना अटक; 'स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - परभणी क्राईम न्यूज
काही जण सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर पैसे लावत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तिथे तिघे जण मोबाईलवरुन आयपीएलवर सट्टा लावत असल्याचे निदर्शनास आले.
गुप्त माहितीवरून टाकला छापा
काही जण सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर पैसे लावत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रेकर, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे यांच्या पथकाने भारस्वाडा येथील एका शेतातील आखाड्यावर मंगळवारी रात्री छापा मारला.
दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तिथे तिघे जण मोबाईलवरुन आयपीएलवर सट्टा लावत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने त्या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 5 हजार 40 रुपये रोख, 32 हजार रुपयांचे मोबाईल, 40 हजार रूपयांची दुचाकी असा एकूण 77 हजार 40 रुपयांचा ऐवज जप्त केला. दरम्यान, या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.