परभणी- सेलू येथील मध्यवर्ती सहकारी बँकेची रोकड घेऊन जात असताना दुचाकीस धडक देत चोरट्यांनी बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 2 लाखाची रोकड लंपास केली. देऊळगाव गात ते डासाळा रस्त्यादरम्यान ही घटना घडली.
बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 2 लाखांची रोकड लंपास, सेलुमधील घटना - बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 2 लाखांची रोकड लंपास
कर्मचारी सोमवारी सकाळी सेलू येथील बँकेच्या शाखेतून दुचाकीने बँकेची रोकड घेऊन जात होते. रोखपाल पवन फुलमाळी हे दुचाकी चालवत होते. याचवेळी अचानक दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी या बँक कर्मचार्यांच्या दुचाकीस धडक देऊन गाडी थांबविली

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सेलू तालुक्यातील डासाळा येथे शाखा आहे. या शाखेत बँक शाखाधिकारी के.एन.मांडे तर रोखपाल म्हणून पवन फुलमाळी हे कार्यरत आहेत. सदर कर्मचारी सोमवारी सकाळी सेलू येथील बँकेच्या शाखेतून दुचाकीने बँकेची रोकड घेऊन जात होते. रोखपाल पवन फुलमाळी हे दुचाकी चालवत होते.
याचवेळी अचानक दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी या बँक कर्मचार्यांच्या दुचाकीस धडक देऊन गाडी थांबविली. त्यातच पवन फुलमाळीच्या डोळ्यात मिरचीपुड टाकत मारहाण केली. तसेच रोकड घेऊन पाठीमागे बसलेले शाखाधिकारी के. एन. मांडे यांना या चोरट्यांनी दगड, काठ्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील बँकेची सुमारे दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. दरम्यान, या घटनेत सदर बँक कर्मचार्यांनाही गंभीर दुखापत झाली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत तपास सुरु केला आहे.