महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मॉर्निंगवॉक करणाऱ्या चौघांना ट्रकने चिरडले; 2 ठार, 2 गंभीर - परभणी ट्रक अपघात 2 ठार

पाथरी-नृसिंह पोखर्णी या रस्त्यावरील केकरजवळा परिसरात एका ट्रकने पहाटे चौघांना धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृतामध्ये पोलीस पाटील उत्तमराव लाडाने आणि आत्माराम लाडाने यांचा समावेश आहे. तर, नंदकिशोर लाडाने, राधाकिशन लाडाने यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Parbhani
Parbhani

By

Published : Sep 12, 2021, 11:54 AM IST

परभणी : पाथरी-नृसिंह पोखर्णी या रस्त्यावरील केकरजवळा शिवारात आज (12 सप्टेंबर) पहाटे एक दुर्घटना घडली. एका अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत 2 ग्रामस्थांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे ग्रामस्थ पहाटेच्यावेळी मॉर्निंगवॉक करत असताना ही दुर्घटना घडली.

मृतांची नावं

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आज पहाटेच्या सुमारास परभणीहून पाथरीकडे जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या बाजूने मॉर्निंगवॉक करणाऱ्या 2 ग्रामस्थांना धडक दिली आणि हा ट्रक सुसाट वेगाने पुढे निघून गेला. त्यामुळे या वाहनाचा पत्ता लागला नाही. या अपघातात दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. मृतांमध्ये उत्तमराव लाडाने व आत्माराम लाडाने यांचा समावेश आहे.

मृतांमध्ये पोलीस पाटील

आज पहाटेच्या सुमारास केकरजवळा गावचे पोलीस पाटील उत्तमराव लाडाने व गावातील आत्माराम लाडाने, नंदकिशोर लाडाने, राधाकिशन लाडाने हे पाथरी-पोखर्णी रोडवर मॉर्निंगवॉक करत होते. त्याचवेळी पोखर्णीहून (परभणी) पाथरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने या चारही जणांना धडक दिली. यात उत्तमराव लाडाने व आत्माराम लाडाने यांचा जागीच मृत्यू झाला, तर नंदकिशोर लाडाने व राधाकिशन लाडाने यांच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या वाहनाचा पोलिसांनी शोध सूरू केला आहे.

हेही वाचा -हातोडीचा धाक दाखवून उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details