परभणी - गेल्या दोन दिवसांच्या ढगाळ परिस्थितीनंतर आज गुलाबी थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या मोसमातील सर्वात निचांकी अर्थात 10.9 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान आज परभणीत नोंदविण्यात आले आहे. थंडीचा जोर आणखी वाढला असून थंडगार बोचर्या वार्यांनी परभणीकरांना चांगलेच गारठवून टाकले आहे.
परभणीत थंडीचा जोर वाढला; पारा दहा अंशावर - परभणीत किमान तापमान
या थंडीचा परिणाम सकाळी विद्यापीठ परिसरात मॉर्निंगवॉकला जाणार्या नागरिकांवर झालेला दिसून आला आहे. शेकडोंच्या संख्येने फिरणार्या नागरिकांची संख्या डझनावर आली होती. दुधवाले, पेपर, भाजीपाला विक्रेते उशिराने येत आहेत. दुसरीकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी परभणीच्या स्टेशन रोडवर तिबेटीयन लोकांच्या गरम कपड्यांच्या दुकानांवर गर्दी होत आहे.
उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेच्या झळा सोसणार्या परभणीकरांना तेवढ्याच तिव्रतेने थंडीचा कडाकाही सोसावा लागत आहे. साधारणपणे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी परभणीत थंडीचा जोर वाढतो. मात्र, यावर्षी पाऊसमान लांबल्याने थंडीसाठी नोव्हेंबर उजाडला. तर मागील महिनाभरात 13 ते 15 अंश ईतक्या तापमानामुळे थंडी वाढली होती. बुधवारी रात्री तर पाऊस पडला. त्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. परंतु, काल रात्रीपासून पुन्हा एकदा थंडीची लाट आली आहे. या थंडीचा परिणाम सकाळी विद्यापीठ परिसरात मॉर्निंगवॉकला जाणार्या नागरिकांवर झालेला दिसून आला आहे. शेकडोंच्या संख्येने फिरणार्या नागरिकांची संख्या डझनावर आली होती. दुधवाले, पेपर, भाजीपाला विक्रेते उशिराने येत आहेत. दुसरीकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी परभणीच्या स्टेशन रोडवर तिबेटीयन लोकांच्या गरम कपड्यांच्या दुकानांवर गर्दी होत आहे. दरम्यान, काल संध्याकाळी 6 वाजेनंतरच थंडी जाणवू लागली आहे. ज्यामुळे सकाळ आणि संध्याकाळची कामे थंडावली आहेत. परिणामी, सकाळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसतो. तर या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. सर्दी, खोकला, तापीचे रूग्णांत वाढ होताना दिसत आहो.
"गतवर्षी याच दिवशी पारा 3 अंशावर"
परभणीच्या इतिहासात 17 जानेवारी 1968 आणि 17 जानेवारी 2003 रोजी 2.8 एवढे निच्चांकी तापमान नोंदवल्या गेले होते. तर, 7 जानेवारी 2011 ला 3.9 अं.से. आणि 18 डिसेंबर 2014 ला 3.7 अं. सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर गेल्यावर्षी 28 डिसेंबरलाच पारा चक्क 3 अंशावर गेला होता. जो की 15 वर्षातील विक्रमी नोंद आहे, अशी माहिती येथील कृषी विद्यापीठ हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.