महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत गुरुवारी 650 कोरोनाबाधित; 24 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून आज गुरूवारी 650 नवीन बाधित आढळले तर 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समाधानकारक बाब म्हणजे 639 व्यक्तीं कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

The number of corona patients in Parbhani
परभणीत गुरुवारी 650 कोरोनाबाधित

By

Published : May 6, 2021, 8:16 PM IST

परभणी- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असल्याचे दिसून येत आहे. आज गुरूवारी 650 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. समाधानकारक बाब म्हणजे 639 व्यक्तीं कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

7850 बधितांवर उपचार सुरू

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून आज गुरूवारी 650 नवीन बाधित आढळले तर 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 7 हजार 850 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 983 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 41 हजार 452 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 32 हजार 619 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 59 हजार 77 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 17 हजार 535 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 41 हजार 452 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1041 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक बधितांचे मृत्यू -

दरम्यान गेल्या 24 तासात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 14 पुरुष तर 10 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात 7 तर आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये 4 व जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनन्या 2 तर परभणी आयसीयू, प्राईम, भारत, देशमुख आणि सूर्या या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 1 अशा एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात 459 बेड शिल्लक -

दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खाजगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना हॉस्पिटल सुरू असून, या रुग्णालयांमध्ये 1839 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या 459 बेड रिकामे आहेत. यामध्ये रेणुका हॉस्पिटल येथे 145 बेड रिकामे असून, जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटल मध्ये 65 बेड तर जिल्हा रुग्णालयात 3, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 54, परभणी आयसीयू 2, स्वाती 12, भारत हॉस्पिटल 27, डॉ.प्रफुल पाटील हॉस्पिटल 31, देशमुख 4, अक्षदा मंगल कार्यालय 16, सूर्या 4, प्राईम 18, मोरे 5, अनन्या 7, सामले 6, सिद्धिविनायक 3, ह्यात 5, सुरवसे मॅटर्निटी 2, पार्वती 8, देहरक्षा 17, स्पर्श हॉस्पिटल 18, तर गोकुळ हॉस्पिटलमध्ये 7 बेड शिल्लक आहेत. तर 6 हजार 474 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत. दरम्यान, नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - परभणीत लॉकडाऊनमध्ये लपून व्यवहार करणे पडले महागात; 17 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details