परभणी - येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या नृसिंह साखर कारखान्यात आज (रविवारी) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास टरबाइन नावाच्या मशनरीचा स्फोट झाला. यामध्ये मशीनचे इंजिनिअर असलेले शेख युनूस (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाय मशीनजवळ असलेले इतर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नृसिंह सहकारी साखर कारखाना हा एका उद्योजकाने खाजगी तत्त्वावर चालवण्यासाठी घेतला आहे. नवीन गळीत हंगाम सुरू करण्यासाठी या कारखान्यातील सर्व मशनरीची तपासणी सुरू होती. त्यापैकी टरबाइन नावाच्या मशीनमध्ये ऊस बारीक करण्याचे काम होत असते. याच मशीनच्या स्पीडची तपासणी सुरू होती. त्यातच या मशीनचा स्फोट झाला. यात अभियंते शेख युनूस (वय ६५ वर्ष रा. नळदुर्ग जि. उस्मानाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला.