परभणी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात सडलेली फळे टाकून अधीक्षकांच्या खुर्चीला चपलांचा हार घालत आंदोलन केले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील जवळपास दोनशे एकर वरील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये 2 फेब्रुवारी रोजी जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये प्रामुख्याने परभणी तालुक्यातील जाम, मांडाखळी शिवारात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे संत्री आणि इतर काही फळपिकांचे नुकसान झाले होते. मांडाखळी आणि जाम परिसरातील सुमारे शंभर ते दोनशे एकरवरील संत्रीचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाला तात्काळ निवेदन देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा - कृषी शिक्षणाला हवाय व्यावसायिक दर्जा; परभणीच्या कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मागणी