महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात 3 दिवस संचारबंदी; कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई - parbhani corona latest news

परभणी जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवातीचे दोन महिने ग्रीनझोनमध्ये राहणाऱ्या परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच रेड झोनमधील नागरिकांची आवक सुरू झाली आणि पाहता पाहता शून्य संख्या असलेल्या परभणीत 36 कोरोनाबाधित आढळून आले.

परभणी जिल्ह्यात 3 दिवस संचारबंदी; कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
परभणी जिल्ह्यात 3 दिवस संचारबंदी; कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

By

Published : May 25, 2020, 8:15 PM IST

परभणी - मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा रेड झोन जिल्ह्यांमधून तसेच परराज्यातील नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात परभणी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यांच्यामार्फत कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसात दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या विषाणुचा प्रसार थांबवण्यासाठी उद्या 26 मेच्या सकाळी 7 वाजेपासून 28 मे च्या रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पार्श्‍वभूमीवर कोणीही बाजारात किंवा गल्लीमध्येदेखील फिरू नये. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे.

परभणी जिल्ह्यात 3 दिवस संचारबंदी; कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

परभणी जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवातीचे दोन महिने ग्रीनझोनमध्ये राहणाऱ्या परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच रेड झोनमधील नागरिकांची आवक सुरू झाली आणि पाहता पाहता शून्य संख्या असलेल्या परभणीत 36 कोरोनाबाधित आढळून आले. शिवाय त्यांच्या संपर्कात स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. ज्यामुळे त्यांच्यादेखील जीवितास धोका निर्माण झाला आहे. परिणामी यापूर्वी 25 मे पर्यंतच्या लॉकडाऊन आदेशाला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पुढे वाढवले आहे. ज्यात केवळ लॉकडाऊन न करता 28 मे पर्यंत कडक संचारबंदीचे आदेश आज सोमवारी सायंकाळी 5.15 वाजता जारी केले आहेत. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून परभणी महानगर पालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सुद्धा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ज्यामध्ये नागरिकांनी घराबाहेर देखील पडायचे नाही, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीतच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.

सूट देण्यात आलेल्या सेवा -


– सर्व शासकीय कार्यालये, कर्मचारी आणि शासकीय वाहने.
– सर्व शासकीय व खासगी दवाखाने, औषधी दुकाने.
– शासकीय निवारागृहे, कॅम्पमधील बेघर व गरजुंना अन्न वाटप करणाऱ्या संस्था व त्यांची वाहने.
– अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती.
– वैद्यकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा.
– प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक.
– घरोघरी फिरून विकणारे दुध-विक्रेते (केवळ सकाळी 6 ते 9 एका ठिकाणी थांबून दूध विक्रीस बंदी)
– खत वाहतूक, त्यांची गोदामे / दुकाने, त्याच्यासाठी लागणारी वाहने व कामगार.
– राष्ट्रीयीकृत बँका (केवळ रास्तभाव दुकानदार यांच्याकडून चलनाव्दारे पैसे भरणा करून घेणे या बाबीकरिता).

याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती व वाहने रस्त्याने, बाजारात आणि गल्लीमध्ये तसेच घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details