महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अधिकाऱ्यांकडून छळ; एसटी चालकाचा नस कापून आत्महत्येचा प्रयत्न - ST officer harassment in Jintur bus depo

परिवहन महामंडळाच्या जिंतूर आगारातील 2 वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक लांब पल्याची ड्युटी देत असल्याची चालक उल्हास उंडेगावकर यांचा दावा आहे. तसेच खराब गाडी देऊन त्रास देत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

उल्हास उंडेगावकर
उल्हास उंडेगावकर

By

Published : Dec 31, 2020, 8:34 PM IST

Updated : Dec 31, 2020, 9:19 PM IST

परभणी - जिल्ह्यातील जिंतूर आगारात काम करणाऱ्या एसटी बस चालकाने अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने चालकाची प्रकृती सुखरूप आहे. उल्हास उंडेगावकर असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे चालकाचे नाव आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या जिंतूर आगारातील 2 वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक लांब पल्याची ड्युटी देत असल्याची चालक उल्हास उंडेगावकर यांचा दावा आहे. तसेच खराब गाडी देऊन त्रास देत असल्याचाही त्यांनी आरोप केला. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजता हाताची नस कटरने कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जिंतूर आगारातील वाहन परीक्षक यांच्या दालनात घडला.

एसटी चालकाचा नस कापून आत्महत्येचा प्रयत्न

हेही वाचा-धक्कादायक..! रेल्वे उद्धघोषकाचा व्हिडिओ व्हायरलकरून आत्महत्येचा प्रयत्न

'पुढील उपचारासाठी परभणीत हलविले -

वाहन चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लक्षात येतात इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ उंडेगावकर यांना जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला पाठविले. परभणी बस स्थानकाजवळील एका खासगी रुग्णालयात चालक उंडेगावकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सायंकाळी त्यांच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान ही घटना घडण्यापूर्वी उल्हास उंडेगावकर यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ड्युटी आणि वाहन देण्यावरून वादावादी झाली होती. त्यानंतर वैतागलेल्या गुंडेगावकर यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा-माढ्यात प्रियकराच्या मदतीने आईने केला पोटच्या मुलाचा खून

'ड्युटी देणारे अधिकारी नाहक त्रास देत असल्याचा आरोप -

दरम्यान, मागील दीड ते दोन वर्षांपासून जिंतूर एसटी आगारातील भगवानराव ढाकणे आणि चिपले हे दोन ड्युटी लावणारे अधिकारी चालक उल्हास उंडेगावकर यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप उल्हास उंडेगावकर यांच्या वडिलांनी केला आहे. तसेच उल्हास गुंडेगावकर यांनीदेखील परभणीच्या नवामोंढा पोलिसांना याप्रकरणी जबाब दिला आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

Last Updated : Dec 31, 2020, 9:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details