महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीतील १६ पोलिसांना महसंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान - dirctor of genral police

शिवाय विविध जुगार अड्डे आणि अवैध धंद्यांवर छापे टाकून कारवाई केली. विशेषतः बनावट ऑइल, बनावट गुटखा, बनावट खते आदींची कारखाने उद्धवस्त करून विशेष कामगिरी केली आहे.

१६ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By

Published : May 1, 2019, 3:04 PM IST

परभणी - उत्तम कामगिरी बजावत कर्तव्य पार पडणाऱ्या परभणी पोलीस दलातील १६ कर्मचाऱ्यांना राज्याचे पोलीस महासंचालकांनी विशेष सन्मानचिन्ह जाहीर केले होते. या जवानांना हे सन्मानचिन्ह महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी प्रदान केले आहेत.

१६ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

परभणी पोलिसांनी गेल्या वर्षभरात विविध गुणांचा छडा लावला आहे. अनेक फरार आरोपी मोठ्या शिताफीने पकडून गजाआड केले. शिवाय विविध जुगार अड्डे आणि अवैध धंद्यांवर छापे टाकून कारवाई केली. विशेषतः बनावट ऑइल, बनावट गुटखा, बनावट खते आदींची कारखाने उद्धवस्त करून विशेष कामगिरी केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची दखल स्वतः राज्याचे पोलीस महासंचालक यांनी घेतली. त्यानुसार उत्तम कामगिरी बजावणाऱ्या परभणी पोलीस दलातील सोळा कर्मचाऱ्यांना विशेष सन्मानचिन्ह जाहीर केले होते. हे सन्मान चिन्ह महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी संबंधित या १६ कर्मचाऱ्यांना प्रदान केले आहेत. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व व विभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पोलीस महासंचालकांनी सन्मानचिन्ह बहाल केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये गणेश कदम, सुग्रीव केंद्रे, नारायण आवटे, शेख आयुब, सय्यद मोइन, असदुल्ला शहा, शिवाजी मोरे, जावेद पठाण, सतीश खाडे, सखाराम विरकर, बबन शिंदे, बालाजी फड, मुजीब जफर, रवींद्र भूमकर, बाजीराव निकाळजे यांचा समावेश असून, त्यांच्या छातीला सन्मानचिन्ह लावून पोलीस अधीक्षक आणि त्यांचा गौरव केला.

ABOUT THE AUTHOR

...view details