परभणी -शहर महानगरपालिकेने परभणी शहराच्या हद्दीत विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना परवाना घेण्याचा आदेश बजावला आहे. मात्र, मनपा प्रशासनाने हा आदेश तत्काळ रद्द करावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर यांनी दिली.
2018 चा ठराव तीन वर्षानंतर बंधनकारक -
परभणी शहर महानगरपालिकेच्या हद्दीत विविध व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यापारी तथा अस्थापनाधारकांनी महापालिकेकडून व्यवसाय परवाना काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने 2018 साली घेतलेल्या ठरावाचा आदेश आता तीन वर्षानंतर बंधनकारक केला आहे. मागील वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे बाजारपेठ बंद होती. त्यामुळे सदर सर्व व्यापाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात आता कुठे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. नोकरदारांचे पगार, दुकान भाडे, वीजबील, व्यवसायकर आदी बाबींचा खर्च भरून काढणेही फार जिकिरीचे झाले आहे. त्यात मनपाचे परवाने बंधनकारक करून व्यापाऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचा प्रकार होत असल्याचे शिवसेनेने मनपा आयुक्त देविदास पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अवाजवी परवाना करामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष-