परभणी - शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच पार्किंगची व्यवस्था आणि स्वच्छतेचे प्रश्न देखील गंभीर झाले आहे. या संदर्भात वेळोवेळी सांगूनही मनपा प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे मनपा प्रशासन जिवंत आहे की नाही ? असा सवाल उपस्थित करत सोमवारी पितृपक्षाच्या सुरुवातीलाच शिवसेनेतर्फे मनपा प्रशासनाचे श्राद्ध घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
परभणीत शिवसेनेने घातले मनपा प्रशासनाचे श्राद्ध
शहरात पार्किंगची सुविधा अत्यंत तोकडी असून, सणासुदीच्या काळात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. कोरोनाच्या काळात स्वच्छतेकडे देखील मनपाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शिवसेनेतर्फे मनपा प्रशासनाचे श्राध्द घालण्यात आले.
म्हणून घातले श्राद्ध
शहरात पार्किंगची सुविधा अत्यंत तोकडी असून, सणासुदीच्या काळात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. परिणामी वाहतूक पोलीसांकडून ही वाहने जप्त करून नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे मनपाने शहरात पार्किंगची व्यवस्था करावी. याबरोबरच कोरोनाच्या काळात स्वच्छतेकडे देखील मनपाचे दुर्लक्ष होत आहे. या विरोधात निवेदने देवून, आंदोलने करून देखील मनपा लक्ष देत नाही. त्यामुळे मनपाचे प्रशासन मेले की काय ? असा सवाल उपस्थित करत मनपाच्या माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना विधानसभेच्या महिला संघटक अंबिका डहाळे यांनी मनपाचे श्राद्ध घातल्याचे सांगितले.
TAGGED:
शिवसेनेचे आंदोलन