परभणी- कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या शहरातील हजारो बाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महापालिकेच्या 9 योद्ध्यांचा शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या वतीने रविवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. खासदार संपर्क कार्यालयासमोर आयोजीत केलेल्या या कार्यक्रमाद्वारे त्यांचे परभणीकरांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.
आतापर्यंत 1 हजार 40 मृतांवर अंत्यसंस्कार
दरम्यान, 'गेल्या वर्षभरापासून शहरासह जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर सर्व सोपस्कार पूर्ण करीत, अंत्यसंस्कार करणारे महापालिकेअंतर्गत रुग्णवाहिकेच्या चालकासह, 9 कोरोनायोद्धे इमानेइतबारे अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. विशेषतः हे कोरोनायोद्धे या अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचा काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहेत. मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांच्या भावनांचीसुध्दा दखल घेत आहेत. या संवेदनशील विषयात या योद्ध्यांनी आतापर्यंत कर्तव्यात तसूभरसुध्दा दिरंगाई केलेली नाही. तसेच तक्रारसुध्दा येवू दिली नाही. महापालिकेचे हे कोरोनायोद्धे कोणत्याही तक्रारीविना सेवा बजावित आहेत. या योद्ध्यांनी आतापर्यंत 1 हजार 40 मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व कामास आपण सलाम करत असल्याचे', खासदार जाधव म्हणाले.
11 हजार रुपये रोख देवून कोरोना योद्ध्यांचा सन्मान