महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावधान! फेसबुकवरून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार - parbhani crime news

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवले. तिला वेगवेगळ्या शहरात नेऊन आरोपी मनोहर वावळे या तरुणाने तिच्यावर अत्याचार केले.

भयंकर! फेसबुकवरून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

By

Published : Sep 25, 2019, 9:03 PM IST

परभणी -एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

गंगाखेड पोलीस ठाणे

हेही वाचा - अकोल्यात गावगुंडाच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत, गावकऱ्यांचा मोर्चा

गंगाखेड शहरातील मनोहर वावळे या तरुणाने शहरातीलच एका तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख केली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून अत्याचार केले. त्यानंतर मनोहरने त्या तरुणीवर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने गंगाखेड पोलिसांना दिली. त्यावरून गंगाखेड पोलिसांनी आरोपी मनोहर वावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - सांगलीमध्ये सोन्याच्या दुकानातुन तब्बल दोन किलो सोने कारागिराने पळवले

ABOUT THE AUTHOR

...view details