महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीतील स्कूल व्हॅनचालकांचा 'आरटीओ' विरोधात बेमुदत बंद

शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या व्हॅनचालकांनी आजपासून (बुधवार) आरटीओ प्रशासनाविरुद्ध बेमुदत बंद पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे.

parbhani school van drivers
परभणीतील स्कूल व्हॅनचालकांचा आरटीओ विरोधात बेमुदत बंद

By

Published : Dec 11, 2019, 5:06 PM IST

Updated : Dec 11, 2019, 5:21 PM IST

परभणी- शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या व्हॅनचालकांनी आजपासून (बुधवार) आरटीओ प्रशासनाविरुद्ध बेमुदत बंद पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी देखील एक दिवसांचा बंद पुकारून वाहनचालक संघटनेने आंदोलन छेडले होते. परंतु, कारवाई सुरूच राहिल्याने पुन्हा संघटनेने बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

परभणीतील स्कूल व्हॅनचालकांचा आरटीओ विरोधात बेमुदत बंद

हेही वाचा -जीएसटी परतावा लवकर मिळावा, महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे मागणी

येथील स्कूलव्हॅन व ऑटोचालक संघटनेच्यावतीने यापूर्वी 30 नोव्हेंबरला देखील बंद पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी वरिष्ठांना कळवून कारवाईमध्ये काही मार्ग काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, त्यानंतरही कारवाई सुरू होती. त्यामुळे संतापलेल्या स्कूल व्हॅनचालक तसेच ऑटोचालकांनी आज (बुधवार) पासून बेमुदत बंदचे आंदोलन छेडले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तंबू टाकून या आंदोलकांनी बेमुदत उपोषण देखील सुरू केले आहे.

हेही वाचा -गोपीनाथगडावर पंकजा मुंडे काय घेणार भूमिका!

दरम्यान, यावेळी आंदोलकांनी 7 अधिक 1 अशी परवानगी असताना देखील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील तीनशेहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी देखील अशीच कारवाई करण्यात आली. परंतु, त्यावेळी 31 डिसेंबरपर्यंत कागदपत्रांच्या पूर्ततेची सवलत आरटीओ विभागाने दिली होती, असे असतानाही पुन्हा एकदा आरटीओ विभागाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे ऑटोचालक तसेच स्कूल व्हॅनचालक गोंधळून गेले आहेत.

मंगळवारी देखील 50 गाड्यांना नोटीस बजावण्यात आली तर, 25 गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती ऑटो रिक्षा संघटनेचे संतोष ठाकूर यांनी दिली. त्यामुळेच हा आजपासूनचा बेमुदत बंद तसेच उपोषण सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आरटीओकडून होणारी कारवाई त्वरित थांबवावी. आहे त्या रिक्षा आणि गाड्यांना परमिट द्यावा, तसेच यापुढे कारवाई होणार नाही, असे लेखी दिल्यासच हा बंद मागे घेतला जाईल, असा इशारा देखील यावेळी ठाकूर यांनी दिला.

पालकांची झाली धावपळ

दरम्यान, विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या गाड्याच बंद असल्याने प्रत्येक पालकाला आपल्या विद्यार्थ्याला दुचाकीने अथवा खासगी रिक्षातून शाळेत नेवून सोडावे लागले. त्यामुळे सकाळच्या वेळी तसेच दुपारनंतरही रस्त्यांनी अनेक पालक आपल्या पाल्यांना नेताना दिसत होते. दिवसभर पालकांची कसरत झाल्याचे दिसून आले.

Last Updated : Dec 11, 2019, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details