परभणी - बीड जिल्ह्यातील पालवणचा सह्याद्री देवराई हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरत असून, त्याच धर्तीवर परभणी जिल्ह्यातील भोगावदेवी पर्यटनस्थळी सह्याद्री देवराई प्रकल्प राबविण्यात येणार आहे. देवराईच्या या कामाची लवकरच सुरुवात होणार असून यासाठी वृक्षप्रेमी तथा प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे ते स्वत: उपस्थित राहून वृक्षारोपण करणार आहेत. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधला आहे.
परभणीत सयाजी शिंदे राबवणार सह्याद्री देवराई प्रकल्प, भोगावदेवी पर्यटनस्थळ होणार 'हिरवेगार' - परभणीत सयाजी शिंदे राबवणार सह्याद्री देवराई प्रकल्प
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे आई जगदंबेच्या मंदिर परिसरात भोगावदेवी पर्यटनस्थळ विकसित केले जात आहे. त्याठिकाणी वृक्षप्रेमी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे हे स्वतः देवस्थान व आपल्या सर्व टिमच्या माध्यमातून सह्याद्री देवराई प्रकल्प उभा करणार आहेत. या कामाची लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. संस्थानच्या 70 एकर जमिनीवर ही बाग साकारणार आहेत. या ठिकाणी महत्त्वाची व दुर्मिळ होत जाणारी तसेच दिर्घकाळ टिकणारी फळझाडे लावली जाणार आहेत.
यावेळी ते म्हणाले, की परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे आई जगदंबेच्या मंदिर परिसरात भोगावदेवी पर्यटनस्थळ विकसित केले जात आहे. त्याठिकाणी वृक्षप्रेमी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे हे स्वतः देवस्थान व आपल्या सर्व टिमच्या माध्यमातून सह्याद्री देवराई प्रकल्प उभा करणार आहेत. या कामाची लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. संस्थानच्या 70 एकर जमिनीवर ही बाग साकारणार आहेत. या ठिकाणी महत्त्वाची व दुर्मिळ होत जाणारी तसेच दिर्घकाळ टिकणारी फळझाडे लावली जाणार आहेत. बाजुलाच असणारे तळे सुशोभित करून परिसर हिरवागार केला जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व जाणकार, शेतकरी, नोकरदार, व्यापारी, समाजसेवक यांची एक टीम तयार करून हे काम हाती घेतले जाणार आहे. सर्वांनी मिळून आई जगदंबेचा डोंगर हिरवागार करण्याचा संकल्प केला आहे. सह्याद्री देवराई भोगावदेवी पर्यटनस्थळ कमिटीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन वृक्ष लागवड चळवळीचे प्रमुख सयाजी शिंदे, अण्णा जगताप व रवी देशमुख यांनी केले आहे.