परभणी - ओला दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी सेलू तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. सततच्या पावसाने परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात जिल्ह्यातील सेलू येथे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शासनाने सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा. तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, यासह अन्य मागणीसाठी आज शेकडो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सेलूच्या रायगड कॉर्नर येथे निदर्शने करत रास्तारोको केला.
सरसकट मदतीच्या मागणीसाठी सेलूत शेतकऱ्यांचा रास्तारोको - परभणी शेतकरी रास्तारोको आंदोलन
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, यासह अन्य मागणीसाठी आज शेकडो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सेलूच्या रायगड कॉर्नर येथे निदर्शने करत रास्तारोको केला.
![सरसकट मदतीच्या मागणीसाठी सेलूत शेतकऱ्यांचा रास्तारोको rastaroko-agitation-by-farmer-for-compensation-in-selu](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9332256-thumbnail-3x2-selu.jpg)
सेलू तालुक्यातील वालूर महसूल मंडळासह अन्य सर्व मंडळातील सर्व गावातील शेतकर्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी सरसकट मदत मिळावी, या मागणीसाठी संतप्त शेतकर्यांनी सेलू येथील रायगड कॉर्नर भागात निदर्शने केली. या आंदोलनकर्त्यांनी तालुक्यातील सर्वच मंडळात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. विहिरी ढासळल्या आहेत. जनावरे दगावली आहेत. एक प्रकारे अस्मानी संकटच कोसळले असून मूग, उडीद, कापूस, तूर, हळद, ऊस व फळबागांना मोठा तडाखा बसला आहे. अशा या स्थितीत काही मंडळे अतिवृष्टीबाधीत घोषित करणे व उर्वरित मंडळांवर अन्याय करणे, पूर्णतः चुकीचे आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी आंदोलनस्थळी येवून या आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात दत्तराव मगर, रवी डासाळकर, सुंदर गाडेकर, जयसिंग शेळके, जगडोबा जोगदंड, शिवहरी शेवाळे, भागवत दळवे, गोविंद मगर, चंद्रकांत चौधरी, अॅड. रामेश्वर शेवाळे, रामराव मगर, भाऊसाहेब कावरे, बाजीराव शेळके, दीपक चव्हाण, शिवाजी बोचरे, धोंडीराम मगर, दामोधरराव दळवे, लिंबाजी कलाल, अजहर खान महेमुद, अंकुश सोळंके, संजय शेवाळे, दत्तराव काष्टे, मुरलीधरराव शेवाळे, गोपीचंद काळे, परमेश्वर काष्टे, विष्णू काष्टे आदींसह शेतकरी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते.