परभणी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरात विशेष पथ संचलन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. राज्यात सर्वत्र आज शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे.
परभणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिवाजी महाराजांना अभिवादन - rss
विशेष पथसंचलन करुन शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं.
![परभणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिवाजी महाराजांना अभिवादन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2487935-879-f9615453-67a3-40d0-832c-2ce0e84d3b94.jpg)
शिवाजी महाराजांना देशभरातून अभिवादन केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही शहरातून विशेष पथसंचलन करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. केवळ दसऱ्याच्या दिवशी पाहण्यास मिळणारे स्वयंसेवकांचे पथसंचलन आता शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला देखील पाहण्यास मिळत आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून स्वयंसेवकांचा हा उपक्रम सुरू आहे. दरम्यान, स्वयंसेवकांनी शिवाजी चौकातून गांधी पार्क, स्टेशन रोड मार्गाने येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात अभिवादन करून पथसंचालनाचा समारोप केला.