महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, हे दुर्दैव' - परभणीमध्ये पिकांचे नुकसान

परभणी शहरातील बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी राजू शेट्टी बोलत होते. यावेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर इतर पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष किशोर ढगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

By

Published : Nov 6, 2019, 4:33 PM IST

परभणी- शेतकऱ्यांना आज आधार देण्याची गरज आहे. परंतु, आधार देणारे सरकारच पुन्हा संधी मिळेल काय ? यामध्ये व्यस्त आहे. तर केंद्र सरकार देखील दुर्लक्ष करत आहे. गेल्या 10 दिवसात 20 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी हवी आहे. मात्र, सोबतच एकरी 1 लाख रुपये मदत मिळाल्याशिवाय शेतकरी उभा राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली असल्याचे संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.

राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

परभणी शहरातील बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी राजू शेट्टी बोलत होते. यावेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर इतर पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष किशोर ढगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - परभणीच्या 'नटराज'ची घंटा सहावर्षापासून बंद; रंगभूमी दिनानिमित्त कलावंतांनी व्यक्त केला संताप

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, मराठवाड्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान मक्याचे झाले असून सोयाबीन सडून गेले आहे. कापसाची पहिली वेचणी हातून गेली तर तूर, उडीद देखील वाया गेले आहे. एकूणच कुठलेच पीक शेतकऱ्याच्या हाती येणार नाही, अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, हे दुर्दैव आहे. गतवर्षीचा दुष्काळ आणि यावर्षी परतीत झालेला जास्तीचा पाऊस, यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी संघटना या संदर्भात रस्त्यावर उतरल्यानंतर प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. मात्र, हे पंचनाम्याचे नाटक कशासाठी? सर्वत्र नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

हेही वाचा - 'गोदाकाठ' केंद्रशासित प्रदेश करा; परभणीच्या 'त्या' आठ गावातील नागरिकांची राज्यपालांकडे मागणी

शिवाय विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पहिला हप्ता तात्काळ द्यावा. अन्यथा, त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. मागच्या अनेक वर्षात विमा कंपन्यांनी खूप कमावले आहे. आता शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे. मात्र, या सरकारने विमा कंपन्यांना लाडावले आहे. डिजिटल इंडिया म्हणता ना मग पुन्हा पुन्हा कागद कशाला मागता? असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच सरकार कोणाचेही आले तरी आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मी त्यांना सोडणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details