महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर्णा पोलिसांची गुटखामाफियांवर कारवाई; साडेबारा लाखांचा गुटखा जप्त - Tadalkas Road

मंगळवारी पोलिसांनी साडेबारा लाख रुपयांचा गुटखा आणि एक वाहन जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पूर्णा तालुक्यातील ताडकळस रोडवरील कानडखेडा फाट्याजवळ करण्यात आली आहे.

पूर्णा पोलिसांची गुटखामाफियांवर जबरदस्त कारवाई

By

Published : Jun 12, 2019, 11:17 AM IST

परभणी - जिल्ह्यात बोकाळलेल्या गुटखा माफियांना नियंत्रित करण्यात अन्न व औषधी प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आता पोलिसांनी गुटखामाफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पोलिसांनी साडेबारा लाख रुपयांचा गुटखा आणि एक वाहन जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पूर्णा तालुक्यातील ताडकळस रोडवरील कानडखेडा फाट्याजवळ करण्यात आली आहे.


मंगळवारी सकाळी एका चारचाकी वाहनात पालम येथून लाखों रुपयांचा गुटखा पूर्णा शहरात येणार आहे. या गुप्त माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या पथकाने चारचाकी वाहनाचा (क्र.एम.एच.२२-ए-११६८) पाठलाग करून त्यास पकडले. ताडकळस-पूर्णा रोडवरील कानडखेड फाट्याजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.


वाहनाची तपासणी केली असता १६ मोठे पोते भरून गोवा आणि राजनिवास गुटखा मिळाला आहे. वाहन चालक अंकूश नागोराव सूर्यवंशी (रा.देगांव पूर्णा), गुटखा मालक माणिक कदम (रा. पूर्णा) या दोघांनाही ताब्यात घेऊन पूर्णा पोलीस ठाण्यात हजार करण्यात आले आहे. गुटखा तस्करीसंदर्भात अधिक कसून चौकशी केली असता, हा गुटखा जिल्ह्यातील पालम येथील मुंजा रोकडे यांच्याकडून आणला असल्याचे उघडकीस आले आहे.


त्यानंतर तात्काळ फौजदार चंद्रकांत पवार व त्यांच्या पथकाने वेळ न दवडता पालम येथे जाऊन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंजा रोकडे यांच्या गोडाऊन वर छापा मारला. त्या गोडाऊनमध्ये सुमारे ७ लाख लाख रुपयांचा गोवा व राजनिवास गुटख्याचे मोठे ३० पोते मिळाले आहेत.


याप्रकरणी ३ जणांना पूर्णा पोलिसांनी अटक केली असून पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details