परभणी - संसदेत आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपयांचा अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका देशात सर्वाधिक दर असलेल्या परभणीला बसणार आहे. त्यामुळे या वाढलेल्या दराबाबत परभणीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
परभणीकरांना पुन्हा झटका, पेट्रोल वाढल्याने बसणार खिशाला झळ
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात परभणी शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वाधिक आहेत. त्यातच आज केंद्रीय अर्थसंकल्पात झालेल्या करवाढीमुळे इंधनाचे दर पुन्हा भडकणार आहेत. याचा पुन्हा एकदा परभणीतील वाहनधारकांना फटका बसणार असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात परभणी शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वाधिक आहेत. त्यातच आज केंद्रीय अर्थसंकल्पात झालेल्या करवाढीमुळे इंधनाचे दर पुन्हा भडकणार आहेत. याचा पुन्हा एकदा परभणीतील वाहनधारकांना फटका बसणार असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या ठिकाणी सध्या पेट्रोल ७८ रुपये लिटर असून डिझेलचा दर ६८.१७ रुपये लिटर इतका आहे. त्या दोन्हीमध्ये आता एक-एक रुपयांची भर पडणार आहे. विशेषत: पेट्रोल आणि डिझेलचे डीलर सुद्धा या दरवाढीवरुन नाराज दिसत आहेत. येथील उमेदमल भिकूमल पेट्रोल पंपाचे चालक विनय भाटिया यांनी दरवाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, अशी माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.