महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Political Dispute Between Bhamble and Bordikar : बोर्डीकर अन् भांबळे संघर्षात आणखी एक ठिणगी; संघर्ष पेटण्याची शक्यता - बोर्डीकर अन् भांबळे संघर्षात आणखी एक ठिणगी

जिंतूरमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे ( Former MLA Vijay Bhamble ) आणि भाजपचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यात जुना संघर्ष आहे. आता एका शेतात रेशनचा साठा सापडल्याने या संघर्षात ठिणगी पडली आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असून, त्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पेटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त ( Political Dispute Between Bhamale and Bordikar ) होत आहे.

बोर्डीकर अन् भांबळे संघर्षात आणखी एक ठिणगी
बोर्डीकर अन् भांबळे संघर्षात आणखी एक ठिणगी

By

Published : Dec 26, 2021, 10:02 PM IST

परभणी -जिंतूरमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि भाजपचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यात जुना संघर्ष ( Political Dispute Between Bhamble and Bordikar ) आहे. आता एका शेतात रेशनचा साठा सापडल्याने या संघर्षात ठिणगी पडली आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ( ZP Elections ) होत असून, त्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पेटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

बोर्डीकर अन् भांबळे संघर्षात आणखी एक ठिणगी

माजी आमदार विजय भांबळे यांचा आरोप

याबाबत माजी आमदार विजय भांबळे यांनी शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी पत्रकार परिषद घेत जिंतूर तालुक्यातील मुडा शिवारात आमदार मेघना बोर्डीकर यांचे काका तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे बंधू गंगाधर बोर्डीकर यांच्या शेतातून रेशनच्या 118 क्विंटल धान्याचा साठा पोलिसांनी जप्त केल्याचा आरोप केला.

गंगाधर बोर्डीकर रेशनमाफीया, भांबळे याचा आरोप

गंगाधर बोर्डीकर यांच्या मार्फत रेशनचा काळाबाजार होत असून ते रेशनमाफीया असल्याचा आरोपही विजय भांबळे यांनी केला होता. त्यामुळे गंगाधर बोर्डीकर यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणीही भांबळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अजय चौधरी, सभापती रामराव उबाळे, रितेश काळे आदी उपस्थित होते.

...तर गंगाधर बोर्डीकर स्टाईलने उत्तर देऊ

तर यास उत्तर देण्यासाठी शनिवारी (दि.25) गंगाधर बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भांबळेंचे सर्व आरोप फेटाळून लावले. 'भांबळे हे स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना अडचणीत आणतात. ते त्यांच्या कार्यकर्त्यांचे होऊ शकले नाहीत. आरोप करणे ही भांबळे यांची ही जुनी सवय आहे. मात्र, आरोप होऊनही शांत राहण्यासाठी आपण काही साधुसंत नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून तो माल कोणाचा आहे ?, ते शेत कोणाचे आहे ? हे जनतेपुढे आणावे. अन्यथा भांबळे यांना गंगाधर बोर्डीकर स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा गंगाधर बोर्डीकर यांनी यावेळी दिला.

'ते' शेत माझे नाहीच

तसेच या प्रकरणी आपण पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशीही बोललो असून त्यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहोत. हा साठा जिथे सापडला ते शेत माझे नाहीच. त्यामुळे भांबळे यांनी केलेले हे आरोप खोटे असल्याचेही बोर्डीकर यांनी सांगितले. यावेळी भाजप युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे उपस्थित होते.

संघर्ष चिघण्याची शक्यता

दरम्यान, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत च्या निवडणुका होत असून या पार्श्वभूमीवर या 2 कुटुंबातील संघर्ष या आरोपामुळे आणखी चिघळणार असल्याची शक्यता राजकीय क्षेत्रात वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा -Mahadev Jankar On Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते, आम्ही मोठे म्हणत काहींनी आरक्षण नाकारलं - महादेव जानकर

ABOUT THE AUTHOR

...view details