महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोला आता... पोलिसानेच दिला पत्नीला तीन तलाक; 'एमपीएससी'साठी 10 लाख रुपये आणण्याचा तगादा - परभणी पोलीस तीन तलाक प्रकरण

एमपीएससीचे परीक्षेच्या खर्चासाठी माहेरहून 10 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा छळ करून तीन तलाक देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस असलेल्या नवऱ्यासह एकूण 8 जणांविरोधात पूर्णा पोलिसात आज (रविवारी) गुन्हा दाखल झाला.

परभणी
परभणी

By

Published : Mar 28, 2021, 8:30 PM IST

परभणी- जिल्ह्यातील पूर्णा येथे एमपीएससीचे परीक्षेच्या खर्चासाठी माहेरहून 10 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा छळ करून तीन तलाक देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस असलेल्या नवऱ्यासह एकूण 8 जणांविरोधात पूर्णा पोलिसात आज (रविवारी) गुन्हा दाखल झाला.

पूर्णा शहरातील मौलाना आझादनगर येथील रहिवाशी तथा पूर्णा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी सय्यद कलीम सय्यद महेबूब यांचा विवाह वर्षभरापूर्वी नांदेड येथील पीर बुहान नगरात राहणाऱ्या युवतीसोबत झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले नांदविल्यानंतर सासरच्या मंडळींनी संगनमत करून विवाहितेला 'तू माहेरहून नवऱ्याच्या एमपीएससी परीक्षा शिक्षणासाठी 10 लाख रुपये घेऊन ये', असे म्हणत तिचा छळ सुरू केला होता.

पतीसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल -

दरम्यान, सदर विवाहितेने दिलेल्या तक्रारीप्रमाणे, सासरच्या लोकांनी तिच्या पोलीस नवऱ्याचे कान भरून दिल्याने त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ करून तिला उपाशी पोटी ठेवले. 'तुला नांदविणार नाही, असे म्हणत पोलीस नवऱ्याने तीन वेळेस तलाक दिला. सदर प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पती सय्यद कलीम, सासू-सासरे सय्यद महेबूब, दोन नणंद, दीर सय्यद अलीम, नंदई शेख माजीद, अत्यासासू अशा एकूण 8 जणांविरोधात पूर्णा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक भागोजी चोरमले करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details