परभणी - कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे, यासाठी गर्दी होणारे सर्वच कार्यक्रम शासनाने रद्द केले होते; मात्र परभणी महापालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांनी परभणी शहरातील मंगल कार्यालय, खुले लॉन, विना वातानूकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिग व कोविड-19 संदर्भात निर्गमीत केलेल्या सुचनेचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी दिली आहे.
परभणी मनपाने दिली मंगल कार्यालयात लग्न सोहळे करण्याची परवानगी - लग्न समारंभास परवानगी
गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अनेकांचे लग्न सोहळे खोळंबले आहेत; मात्र आता परभणीच्या महापालिकेने 50 लोकांच्या मर्यादेत राहुल मंगल कार्यालयांमध्ये लग्न सोहळा पार पाडण्याची परवानगी दिली आहे. ज्यामुळे आता मर्यादित का होईना; परंतु थाटात लग्न करून इच्छुक जोडप्यांना संसाराला सुरुवात करता येणार आहे.

या संदर्भात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्याचे आदेश आयुक्त पवार यांनी संबंधित प्रभागांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत दिले. त्यानुसार शहरातील नागरिकांना प्रभाग समिती अ, ब, क च्या सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज अर्ज करून आपला सोहळा पार पाडता येणार आहे. दरम्यान, शहरी भागातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंन्सिंग पाळत लग्न सोहळा करण्याची परवानगी यापूर्वी शासनाच्यावतीने एक आदेशाने देण्यात आली आहे.
या संदर्भातील शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभाग यांच्या आदेशानुसार तसेच महसुल व वन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुर्नवसन विभागाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मनपाकडून ही परवानी देण्यात येत आहे. तरी शहरातील सर्व मंगल कार्यालय खुल्या जागेवर, हॉल सभागृह, लग्न समारंभ पार पाडण्यासाठी 50 लोकांच्या मर्यादेत परवानी देण्यात आली असून, यासाठी तरी प्रभाग समिती कार्यालयास संपर्क करून नागरिकांनी विवाह सोहळ्याची परवानगी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त पवार यांनी केले आहे. तर परवानगीसाठी शहरातील नटराज रंग मंदिर येथील प्रभाग समिती 'अ' चे कार्यालय, मनपाची जुनी इमारत तथा प्रभाग समिती 'ब' आणि कल्याण मंडपम, यशोधन नगर, प्रभाग समिती 'क' च्या सहायक आयुक्तांशी संपर्क साधावा, असे देखील मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.