महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत रस्त्यावर सोनं गोळा करायला नागरिकांची झुंबड... - parbhani viral video

ब्राह्मणगाव येथे एका टेम्पोतून मण्यांचे पाकीट पडले. हे मणी सोन्याचे असल्याचे सर्वत्र पसरताच विखुरलेले मणी गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

'people collecting gold' video goes viral in parbhani
परभणीत रस्त्यावर सोनं गोळा करायला नागरिकांची झुंबड...

By

Published : Dec 18, 2019, 4:15 PM IST

परभणी - ब्राह्मणगाव येथे एका टेम्पोतून मण्यांचे पाकीट पडले. हे मणी सोन्याचे असल्याचे सर्वत्र पसरताच विखुरलेले मणी गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. सध्या याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

परभणीत रस्त्यावर सोनं गोळा करायला नागरिकांची झुंबड...

नक्की काय घडलं...?

आज सकाळी गंगाखेडच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोमधून बेन्टेक्सचे मणी असलेले पाकीट रस्त्यावर पडले. संबंधित पाकीट फुटल्यानंतर त्यातील मणी विखुरले; आणि बघता बघता रस्त्यावर एकच झुंबड उडाली. प्रत्येकजण हे सोन्यासारखे वाटणारे मणी वेचण्यात दंग झाला. अनेकांनी रस्त्याच्या बाजूलाच गाड्या लावल्याने सर्वत्र वाहतूक विस्कळीत झाली होती. काही वेळानंतर हे मणी बेन्टेक्सचे असल्याचे लक्षात येताच या लोकांचा हिरमोड झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details