महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाथरीत दरोडा; महिलांना मारहाण करून ३ तोळे सोने लंपास, दगडफेकीत नागरिक जखमी - ROBBERY

घराचा मुख्य दरवाजा तोडून दरोडेखोरांनी ३ तोळे सोने आणि ४८ हजारांचा ऐवज लुटला.

दरोडा ११

By

Published : Apr 4, 2019, 11:26 AM IST

परभणी - पाथरी शहरातील सागर कॉलनीत एका घराचा मुख्य दरवाजा तोडून दरोडेखोरांनी ३ तोळे सोने आणि ४८ हजारांचा ऐवज लुटला. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रय चंद्रकांत मळी असे चोरी झालेल्या घर मालकाचे नाव आहे.

पाथरी पोलिस ठाणे

रविवारी त्यांच्याकडे काही नातेवाईक आले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास मळी यांच्या घराच्या मुख्य दरवाजा तोडून दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्यांनी महिला झोपलेल्या खोलीत त्यांनी प्रवेश करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. बाजूच्या खोलीत झोपलेले मळी त्यांच्या आवाजाने जागे झाले. त्यांनी त्वरित शेजाऱ्यांना फोन करुन याची माहिती दिली. यादरम्यान, दरोडेखोरांनी कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील ३ तोळे सोने आणि ४८ हजार रोख असा ऐवज ताब्यात घेतला.

शेजारी घराकडे येत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. पलायन करताना जमलेल्या नागरिकांवर त्यांनी दगडफेक केली. यात काही नागरिक जखमी झाले. याप्रकरणी दत्तात्रय मळी यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details