महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाथरीचे आमदार मोहन फडांना शक्ती प्रदर्शन पडले भारी; व्यासपीठच कोसळले, कार्यकर्त्यांचा गोंधळ

दुपारी दीड वाजेच्या सुमारास या स्टेजवर उमेदवार मोहन फड यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्टेजच्या क्षमतेपेक्षा अधिक पदाधिकारी आल्याने अचानक हा स्टेज कोसळला. त्यामुळे गोंधळ उडाला. तसेच कार्यकर्ते सैरावैरा झाले.

पाथरीचे आमदार मोहन फड यांचे शक्ती प्रदर्शन पडले भारी; व्यासपीठच कोसळले

By

Published : Oct 4, 2019, 3:14 PM IST

परभणी - जिल्ह्यातील पाथरी मतदारसंघाचे आमदार मोहन फड यांनी गुरुवारी महायुतीच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेसाठी उभारलेले व्यासपीठ आवश्यकतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने कार्यक्रम सुरू असताना अचानक कोसळले. त्यामुळे हे प्रदर्शन भारी पडल्याचा अनुभव तेथील उपस्थितांना आला. या दुर्घटनेत कोणालाही इजा नाही. मात्र, यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

हेही वाचा -रोहित पवार विजयी होणारच! आईसह पत्नीने व्यक्त केला विश्वास

जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार मोहन फड यांच्या सभेचे व्यासपीठ गुरुवारी दुपारच्या सुमारास कोसळले. पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील घटक पक्ष रिपाइं आठवले गटाच्या वतीने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यापूर्वी आमदार मोहन फड यांनी कार्यकर्त्यांना शहरातील नखाते पेट्रोलच्या बाजुला असलेल्या मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची या मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. येथे उपस्थित कार्यकर्त्याना संबोधीत करण्यासाठी स्टेज उभारण्यात आले होता.

हेही वाचा -अभिनेत्री दीपाली सय्यद 'शिव'बंधनात, मुंब्रा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात

दुपारी दीड वाजेच्या सुमारास या स्टेजवर उमेदवार मोहन फड यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्टेजच्या क्षमतेपेक्षा अधिक पदाधिकारी आल्याने अचानक हा स्टेज कोसळला. त्यामुळे गोंधळ उडाला. तसेच कार्यकर्ते सैरावैरा झाले. त्यानंतर स्टेजच्या समोर येऊन उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर माजलगाव रोड-बाजार समितीमार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. तर आमदार मोहन फड यांनी सकाळीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details