महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाथरीचे नामकरण ‘साईधाम’ करा'; आमदार मेघना बोर्डीकरांची मागणी - meghna bordikar news

साईबाबांच्या जन्म स्थळावरून शिर्डी विरुद्ध पाथरी असा संघर्ष पेटला आहे. शिर्डीकरांनी जन्मस्थळाबाबतचा दावा फेटाळला असताना पाथरीसह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते या प्रकरणात एकवटले आहेत.

आमदार मेघना बोर्डीकर
आमदार मेघना बोर्डीकर

By

Published : Jan 24, 2020, 9:00 PM IST

परभणी- संत साईबाबा यांची जन्मभूमी पाथरी असल्याचे कागदोपत्री सिद्ध आहेच. मात्र, हा दावा अधिक प्रभावी करण्यासाठी पाथरी शहराचे नाव बदलून ते 'साईधाम' असे करावे, अशी मागणी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह स्थानिक प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील केले आहे.

पाथरीचे नामकरण ‘साईधाम’ करा'

हेही वाचा-राज्यभर 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; कुठे दगडफेक, तर कुठे रास्ता रोको

पाथरीची ओळखही साईबाबांची पाथरी होणे गरजेचे

साईबाबांच्या जन्म स्थळावरून शिर्डी विरुद्ध पाथरी असा संघर्ष पेटला आहे. शिर्डीकरांनी जन्मस्थळाबाबतचा दावा फेटाळला असताना पाथरीसह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते या प्रकरणात एकवटले आहेत. आता जिंतूर सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनीही या प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे. शिर्डीची ओळख साईबाबांची शिर्डी, अशी झालेली आहे. आपल्या पाथरीची ओळखही साईबाबांची पाथरी अशी होणे गरजेचे आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. तसेच आमदार तथा विश्वस्त बाबाजानी दुर्राणी व पाथरी नगराध्यक्षांनी नगर परिषदेत अशा प्रकारचा ठराव पारित करून तो शासनाकडे पाठवण्याबाबात सूचित केले आहे.

सेलू ते पाथरी काॅरिडोअर विकसीत करावा

याशिवाय जसा शेगाव-पंढरपूर दिंडी मार्ग झाला तसाच साईबांबाचे गुरुस्थान सेलू ते जन्मभूमी पाथरी आणि पुढे कर्मभूमी शिर्डी हा काॅरिडोअर विकसित करावा, अशी मागणी बोर्डीकर यांनी केली आहे. दरम्यान, साई बाबांचे गुरू म्हणून मान्यता असलेल्या सेलू येथील केशवराज बाबा महाराज यांच्या मंदिरात लवकरच महाआरतीचे आयोजन केले जाणार आहे. सेलू शहराचा गुरूस्थान या अनुषंगाने विकास व्हावा, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही बोर्डीकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details