महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जामिया'च्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ परभणीत युवक काँग्रेसची निदर्शने - परभणी

नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनआरसी विरोधात परभणीत युवक काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. तसेच जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला.

Parbhani youth Congress demonstration against jamiya student attacks
परभणीत युवक काँग्रेसची निदर्शने

By

Published : Dec 20, 2019, 8:08 AM IST

परभणी -नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनआरसी विरोधात परभणीत युवक काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. तसेच जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अकबर जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ परभणीत युवक काँग्रेसची निदर्शने

हेही वाचा... आजही असंख्य शाळांमधील विद्यार्थी सुविधेपासून वंचित - सचिन तेंडुलकर

युवक काँग्रेस तर्फे जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अनावश्यक लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच नागरिकत्व संशोधन कायदा, एनआरसी कायद्याविरोधात आणि केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात यवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा... हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक होते हे क्रांतिकारक, भगतसिंहांच्याआधी चढले फासावर

ABOUT THE AUTHOR

...view details