महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीचे येलदरी धरण ९५ टक्के भरले; वीज निर्मितीचे तिन्ही संच सुरू - परभणी येलदरी धरण

येलदरी धरणात यंदा भरपूर पाण्याची आवक झाली आहे. आज धरणात तब्बल ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणावर बसवण्यात आलेले तिन्ही वीज निर्मितीचे संच सुरू झाले आहेत. ज्या माध्यमातून २२.५ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.

परभणीचे येलदरी धरण ९५ टक्के भरले

By

Published : Nov 8, 2019, 5:04 PM IST

परभणी- गेल्या कित्येक वर्षात मृत साठ्यात असणाऱ्या येलदरी धरणात यंदा भरपूर पाण्याची आवक झाली आहे. आज धरणात तब्बल ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणावर बसवण्यात आलेले तिन्ही वीज निर्मितीचे संच सुरू झाले आहेत. ज्या माध्यमातून २२.५ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. येलदरी धरण भरल्याने सिंचनासोबतच या भागातील विजेचा प्रश्नही काही अंशी मिटणार आहे.

परभणीचे येलदरी धरण ९५ टक्के भरले

परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेले येलदरी धरण तब्बल ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. मातीत बांधण्यात आलेले हे धरण आजही भक्कम स्थितीत उभे आहे. धरणाच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीला थोडीफार गळती वगळता हे धरण सुस्थितीत असून या धरणावरील वीज निर्मिती प्रकल्प देखील चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे आजच्या वीज निर्मितीतून दिसून येत आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण भरल्यानंतर त्यातून झालेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे येलदरी धरण काठोकाठ भरले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पावसाळा संपला तरी येलदरी धरणात २५ टक्‍क्‍यांहून अधिक पाणीसाठा होऊ शकला नाही; परंतु परतीच्या तथा अवकाळी पावसामुळे हे धरण आता काठोकाठ भरले आहे. या धरणाची पाणी पातळी ४६१ मीटर असून या धरणात ८९६.५८१ दलघमी अर्थात ३१.१७५ टीएमसी पाणीसाठा होऊ शकतो. ज्यामध्ये सध्या ७७१.८८४ दलघमी जिवंत पाणीसाठा असून या साठ्याची टक्केवारी ९५.३ टक्के एवढी आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने या धरणावर सुरू असलेली वीज निर्मिती देखील गेल्या आठ दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला दोन संच सुरू करण्यात आले होते. त्यातून १५ मेगावॅट वीज निर्मिती होत होती; परंतु कालपासून तिसरे संच देखील सुरू करण्यात आले आहे. ज्यामुळे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. २५४८ क्यूसेसने हा पाण्याचा विसर्ग होत असल्याने पुढील बाजूस असलेले सिद्धेश्वर धरण देखील काही प्रमाणात भरत चालले आहे. ज्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश विभागाचा पाणी प्रश्न मिटणार आहे. यापूर्वी येलदरी धरण २००६ च्या अतिवृष्टीत तुडुंब भरले होते. त्यानंतर २०१३ ला झालेल्या जोरदार पावसात हे धरण ७० टक्‍क्‍यांपर्यंत भरले होते. त्यानंतर यावर्षी हे धरण भरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details