परभणी - तब्बल महिनाभराच्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह इतर खासदारांनी दिल्लीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सेनेच्या खासदारांनी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी केली.
परभणीच्या शिवसेना खासदाराचा दिल्लीत जल्लोष - parbhani shivsena MP Sanjay Jadhav celebration in delhi
तब्बल महिनाभराच्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह इतर खासदारांनी दिल्लीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सेनेच्या खासदारांनी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी केली.
परभणीच्या शिवसेना खासदाराचा दिल्लीत जल्लोष
मागच्या ५ वर्षाच्या सत्ताकाळात राज्य सरकारमध्ये शिवसेनेची एक प्रकारे कुचंबना झाल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. त्यानंतर आता शिवसेनेला आपल्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करता येणार असल्याने शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसेही उपस्थित होते.