महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत सराईत चोरांकडून ११ मोटारसायकल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आरोपी परमेश्वर शिवाजी चव्हाण याच्याकडून हस्तगत केलेल्या दुचाकींमध्ये स्पलेंडर, पल्सर, हिरोहोंडा स्प्लेंडर, हिरोहोंडा सिडी डिलक्स, बजाज कंपनीची 4-एस, सुझुकी, डिस्कव्हर, टिव्हीएस व्हीक्टर अशा विविध कंपनीच्या ११ मोटारसायकल चोरल्या होत्या. याची किमती सुमारे २ लाख १० हजार असून त्या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या.

By

Published : May 20, 2019, 11:56 PM IST

परभणीत सराईत चोरांकडून ११ मोटारसायकल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

परभणी - येथील स्थानिक गुन्हा शाखेने दुचाकी चोरांवर कारवाईचा धडाका लावला आहे. मागच्या महिन्यात चार दुचाकीसह पकडण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून आज त्यांच्या दोन साथीदारांसह चोरीला गेलेल्या 11 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिवाय या चोरट्यांनी अन्य काही साथीदारांसह वसमत येथील एक टेन्ट हाऊसचे दुकान देखील फोडले होते. त्यात चोरीला गेलेला माल देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

परभणीत सराईत चोरांकडून ११ मोटारसायकल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी अशा टोळीच्या मुळापर्यंत जाऊन शोध लावण्याचे आदेश पथकास दिले होते. त्याप्रमाणे मागील काही दिवसापासून पथक सतत मोटारसायकल चोरीचे गुन्हे करणा-या आरोपींची माहिती संग्रहीत करण्याचे काम करत होते.

आज (सोमवार) मिळवलेल्या माहितीप्रमाने पहाटेच्या सुमारास सापळा रचून परमेश्वर शिवाजी चव्हाण (रा. संजय गांधी नगर परभणी) यास ताब्यात घेण्यात आले. तो स्वतः वापरत असलेल्या मोटारसायकलच्या कागदपत्रांची विचारपूस करण्यात आली, मात्र त्याच्याकडे त्या गाडीचे कुठलेही कागदपत्रे नव्हते. त्यामुळे पथकाने त्याची चौकशी करून त्याच्याकडुन विविध कंपनीच्या एकूण ११ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या मोटारसायकल परभणी, वसमत, हिंगोली, नांदेड शहरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोऱ्या त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याची कबुल दिली आहे.

शिवाय चव्हाण याने त्याचे साथीदार जोदरसिंग रंजितसिंग चव्हाण (रा. नवामोंढा रेल्वेस्टेशन रोड वसमत), कुलजितसिंग वरणसिंग जुन्नी (रा . उडाणपुल परभणी) व दोन अल्पवयीन मुलांनी मिळून वसमत जवळच्या सुनेगाव शिवारात टेन्ट हाऊसचे दुकान फोडून सांऊड सिस्टीम व इतर सामान चोरल्याची देखील कबुली दिली होती. पोलिसांनी या प्रकरणातदेखील 3 आरोपींना ताब्यात घेवून मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी

आरोपी परमेश्वर शिवाजी चव्हाण याच्याकडून हस्तगत केलेल्या दुचाकींमध्ये स्पलेंडर, पल्सर, हिरोहोंडा स्प्लेंडर, हिरोहोंडा सिडी डिलक्स, बजाज कंपनीची 4-एस, सुझुकी, डिस्कव्हर, टिव्हीएस व्हीक्टर अशा विविध कंपनीच्या ११ मोटारसायकल चोरल्या होत्या. याची किमती सुमारे २ लाख १० हजार असून त्या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय व अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल गोपीनवार, हनुमंत जक्केवा, मधुकर चट्टे, सुग्रिन केन्द्रे, निलेश भुजबळ, सुरेश डोंगरे, राजेश अगाशे, परमेश्वर शिंदे, करण गायकवाड, गणेश कौटकर, यशवंत बाम, विशाल वाघमारे आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details