महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत लॉकडाऊनमध्ये लपून व्यवहार करणे पडले महागात; 17 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई - विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई

परभणी शहरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. परंतु काही दुकानदार हे परवानगी नसतानाही दुकाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने परभणी महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात आहे. त्यानुसार आज (सोमवारी) आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, तिब्बतवाड यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली आहे.

परभणी पोलीस कारवाई
परभणी पोलीस कारवाई

By

Published : May 3, 2021, 9:52 PM IST

परभणी - परभणी शहरात गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी अनेक व्यवसायिक बाजारपेठांमध्ये बंद शटरआड व्यवहार करताना दिसून येत आहेत. पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगून देखील त्यांचा हा व्यवहार थांबत नव्हता. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अचानक छापे टाकून व्यवहार करणाऱ्या सुमारे 17 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मनपा आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

परभणी शहरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. परंतु काही दुकानदार हे परवानगी नसतानाही दुकाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने परभणी महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात आहे. त्यानुसार आज (सोमवारी) आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, तिब्बतवाड यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये कच्छी बाजार, जनता मार्केट, शिवाजी चौक येथे काही आस्थापना चालू ठेवल्याबद्दल 17 दुकानावर प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 85 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई

परभणी शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. यात 23 नागरिकांवर कारवाई करत एकूण 4 हजार 600 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याकरता लॉकडाऊनचा विचार करा - सर्वोच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details