महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ग्रीनझोन'मुळे हुरळून जाऊ नका, लॉकडाऊन संपेपर्यंत नियमांचे पालन करा - जिल्हाधिकारी - परभणी कोरोना न्यूज

परभणी जिल्हा हा अगदी सुरुवातीपासून ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, 13 एप्रिलला पुण्यातून चोरट्या मार्गाने आलेल्या 21 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अचानक जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला.

parbhani once again in a green zone
'ग्रीनझोन'मुळे हुरळून जाऊ नका, लॉकडाऊन संपेपर्यंत नियमांचे पालन करा

By

Published : Apr 28, 2020, 12:16 PM IST

परभणी - जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्णाचे नंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा ग्रीनझोनमध्ये आला आहे. असे असले तरी नागरिकांनी यामुळे हुरळून जाऊ नये. आपल्याला या संसर्गाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत नियमांचे पालन करायचे आहे. लोकांना केवळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जिवनावश्यक वस्तुंसाठी बाहेर पडण्याची सूट आहे. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत घरात बसूनच या आजारांविरुद्ध लढायचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.

परभणी जिल्हा हा अगदी सुरुवातीपासून ग्रीन झोनमध्ये होता. मात्र 13 एप्रिलला पुण्यातून चोरट्या मार्गाने आलेल्या 21 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अचानक जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला. यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करत एकूण पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता. ज्यामुळे जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यादरम्यान सदर तरुणाचा दोन नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे परभणी जिल्हा पुन्हा ग्रीनझोनमध्ये गेला आहे.

दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

याबाबत "ईटीव्ही भारत"शी बोलताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापर्यंत परभणी जिल्ह्यात 661 संभाव्य रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 619 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 573 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 27 अहवाल सध्या प्रलंबित आहेत, तर 18 अहवाल तपासण्याची आवश्यकता नसल्याचे शासकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून कळविण्यात आले आहे. यापैकी केवळ एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तो रुग्ण परभणीत 13 तारखेला पुणे येथून दाखल झाला होता, मात्र वेळीच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने त्याची प्रकृती स्थिर झाली. तो सध्या ठणठणीत असून त्याचे दोन नमुने निगेटिव्ह आले आहेत. ज्यामुळे परभणी जिल्हा ग्रीनझोन मध्ये गेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांन दिली.

जिल्हा ग्रीन झोनमध्ये गेला असला तरी लॉकडाऊन संपेपर्यंत कोणीही रस्त्यावर येऊ नये. ज्या दुकानदारांना दुकाने उघडण्याची परवानगी आहे, तेवढीच दुकाने उघडी राहतील. सकाळी 7 ते 11 नंतर मात्र कोणीही रस्त्यावर यायचे नाही. या रोगाचे संक्रमण होऊ नये, यासाठी शासन व प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहे. लोकांनी देखील सोशल-डिस्टंन्स, सेल्फ सोल्युशनचा अवलंब करायचा आहे, तरच या रोगाचा आपण सामना करू शकू, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details