परभणी -राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल झाले असून मागील दोन तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. राज यांची चौकशी ही सरकारच्या अघोषीत आणीबाणीचा नमुना आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते आज परभणी येथील जिंतूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमीत्त आले होते.
सरकारचे पितळ उघडे पडू नये म्हणून राज ठाकरेंना ईडीची नोटीस - धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांची राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून सरकारवर टीका
2014 ला राज ठाकरेंनी मोदींना पाठींबा दिला होता. 2019 च्या निवडणूकीत मात्र त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात प्रचार केला. त्यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'मुळे घाबरलेल्या सरकारने आगामी निवडणूकीपूर्वीच त्यांना अडकवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
"सरकार विरोधात बोललात तर तुमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स लागते", ही देशातील अघोषीत आणीबाणी आहे. 15 वर्षे UPA सरकार असतानाही राज ठाकरे टीका करत असत. तेव्हा आम्ही त्यातून चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करत होतो, पण हे सरकार कोणत्याही विरोधी आवाजाला ऐकायला तयार नाही, असेही मुंडे यावेळी म्हणाले.