महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक, कोरोनामुळे परभणीचे जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे निधन - treasury officer sunil waikar

परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे आज (24 एप्रिल) पहाटे ५ वाजता कोरोनामुळे निधन झाले. १५ एप्रिल रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. 26 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध ठिकाणी सेवा बजावली होती. त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे.

Parbhani
Parbhani

By

Published : Apr 24, 2021, 6:09 PM IST

परभणी- परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे आज (24 एप्रिल) पहाटे ५ वाजता कोरोनामुळे निधन झाले. १५ एप्रिल रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ३१ मार्च अर्थात आर्थिक वर्षाच्या ताळेबंद अनुषंगाने त्यांनी जिल्हा कोषाधिकारी पदाची संपूर्ण दक्षता घेऊन जबाबदारी पार पाडली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, सिईओ शिवानंद टाकसाळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

26 वर्षे विविध ठिकाणी सेवा -

सुनील कोंडीबा वायकर हे परभणी येथे जिल्हा कार्यालयात कोषागार अधिकारी या पदी कार्यरत होते. त्यांचा जन्म २ एप्रिल १९६८ रोजी झाला होता. ते २ मे १९९५ रोजी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब लेखाधिकारी या पदावर सेवेत दाखल झाले होते. कालांतराने त्यांना गट अ पदी पदोन्नती मिळाली होती. एकूण 26 वर्षांच्या सेवकाळामध्ये त्यांनी कोषागार कार्यालय उस्मानाबाद, बीड, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर, स्थानिक निधी लेखा बुलढाणा, जिल्हा परिषद वाशिम, जिल्हा कोषागार कार्यालय परभणी या ठिकाणी लेखाधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी, सहाय्यक संचालक, कोषागार अधिकारी अशा विविध पदांवर सेवा बजावली.

मनमिळावू स्वभावामुळे हळहळ व्यक्त -

मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले वायकर हे ९ जुलै २०१९ रोजी कोषागार अधिकारी परभणी या पदी रुजू झाले होते. त्यांच्या सुस्वभावी व प्रेमळ वागणुकीमुळे ते कोषागार कर्मचाऱ्यांचे लाडके अधिकारी होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी वृंद शोकाकुल झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details